शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

युवा संसद स्पर्धेत ७२ स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:04 IST

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल व मालेगाव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या युवा संसद स्पर्धेत मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाला जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व करंडक देऊन गौरविण्यात आले. या विजेत्या संघाची निवड नाशिक परिक्षेत्र स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे.

मालेगाव : नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल व मालेगाव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या युवा संसद स्पर्धेत मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाला जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व करंडक देऊन गौरविण्यात आले. या विजेत्या संघाची निवड नाशिक परिक्षेत्र स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. गुन्हेगारी क्षेत्रापासून अल्पवयीन व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी ंँॅलोकमत मीडिया पार्टनर असलेला महाराष्टÑ पोलीस युवा संसद उपक्रम राबविला जात आहे. येथील आयएमए सभागृहात सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत २४ शाळांमधील ७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. समाजातील जातीयवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या, सोशल मीडिया व क्राइम, मानवी तस्करी आदी विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. चर्चात्मक व प्रश्नोत्तराच्या आधारे स्पर्धा घेण्यात आली.तब्बल पाच तास चाललेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी ज्वलंत विषयांवर मनोगत व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्याला चार मिनिट बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. स्पर्धकांनी सडेतोड मत मांडत होते.  परीक्षक म्हणून कमलाकर देसले, विनोद गोरवाडकर, अनिता नेरे, जहीर कुत्सी आदींनी काम पाहिले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या समारोपानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस-प्रमुख दराडे, अपर पोलीस अधीक्षक पोद्दार, ज्योत्स्ना पोद्दार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  समारोपप्रसंगी जिल्हा पोलीस-प्रमुख दराडे, अपर पोलीस अधीक्षक पोद्दार, परीक्षक कमलाकर देसले, अनिता नेरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन आशिष जैन यांनी केले तर आभार गजानन राजमाने यांनी मानले.युवा संसद स्पर्धेतील विजेतेसांप्रदायिकता या विषयावर मत मांडलेल्या मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते सिद्धी देशपांडे, हृषिकेश हिरे, संपदा गुंजाळ या स्पर्धकांना करंडक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर द्वितीय क्रमांक लखमापूर येथील के. डी. भालेराव इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक हरसूल येथील केबीएच विद्यालयाच्या संघाने पटकाविला. उत्कृष्ट वक्ता म्हणून मालेगाव येथील हजरतबी फातेमा स्कूलच्या शबनम शेख, देशमुख विद्यालयाचे पुनाजी बर्डे, संजीवनी आश्रमचे अविनाश शिर्के या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक शाळांना पोलीस दलाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती वाढावी यासाठीच युवा संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस विद्यार्थ्यांचे मित्र असल्याचे मत जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांनी यावेळी व्यक्त केले.त्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑाच्या भूमीत जन्माला आलेला प्रत्येक विद्यार्थी लिडर आहे. विद्यार्थी व खाकीची मैत्री झाली पाहिजे. हम सुनना चाहते है। और आप बोलते रहे। असे मत अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस