चुंचाळेत घरफोडीत 70 हजाराचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:15 IST2020-08-31T23:20:45+5:302020-09-01T01:15:57+5:30
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खालचे चुंचाळे भागात भरिदवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 70 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुंचाळेत घरफोडीत 70 हजाराचा ऐवज लुटला
ठळक मुद्देसोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे 70 हजाराचा ऐवज चोरून नेला.
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खालचे चुंचाळे भागात भरिदवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 70 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा सुरज पेंढारे (रा.पंचरत्न पार्क) यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. पेंढारे कुटूंबिय शनिवारी (दि.29) दुपारी अल्पावधीच्या कामासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून दहा हजाराची रोकड आण िसोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे 70 हजाराचा ऐवज चोरून नेला.