गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:00 IST2017-09-21T01:00:12+5:302017-09-21T01:00:19+5:30

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबोली धरणातून गंगापूरमध्ये विसर्ग सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्गाला प्रारंभ केला गेला.

7 thousand 700 cusecs out of Gangapur dam | गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग

गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबोली धरणातून गंगापूरमध्ये विसर्ग सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्गाला प्रारंभ केला गेला. संध्याकाळपर्यंत ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरीचा जलस्तर उंचावला होता. मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान केंद्राने केली. गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गाने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले होते.

Web Title: 7 thousand 700 cusecs out of Gangapur dam