सात रुपये किलो : भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज स्वस्त!

By Admin | Updated: March 26, 2017 22:49 IST2017-03-26T22:49:04+5:302017-03-26T22:49:04+5:30

पेठ रोडवरील मध्यवर्ती बाजार समितीमध्ये भरमसाठ आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.

7 kg per kg: Watermelon is cheaper due to increase in arrivals. | सात रुपये किलो : भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज स्वस्त!

सात रुपये किलो : भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज स्वस्त!

नाशिक : उन्हाळ्यातील सर्वांना हवेहवेसे वाटणारे थंडगार असलेले कलिंगड तथा टरबूजाची पेठ रोडवरील मध्यवर्ती बाजार समितीमध्ये भरमसाठ आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.
बाजार समितीत ठिकाणी रोज अकराशे ते बाराशे क्विंटल टरबूज मालाची आवक होत आहे. सरासरी ५०० ते ७०० क्विंटल आवक होत असून, त्याचा भाव ९०० रुपये क्विंटल असा आहे. तर किरकोळ विक्रीचा भाव सात ते आठ रुपये किलो असून, एक नगाचे वजन दीड किलोपासून ते १२ किलोपर्यंत असते. त्यामुळे एक टरबूज ग्राहकाला दहा पंधरा रुपयापासून ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळते, असे बाजार समितीतील द्वारकानाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 7 kg per kg: Watermelon is cheaper due to increase in arrivals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.