मुसळगावच्या विलगीकरण कक्षास ६ बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:12 IST2021-06-02T20:24:02+5:302021-06-03T00:12:45+5:30
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरोना विलगीकरण कक्षास रोटरी क्लब सिन्नरच्या वतीने रुग्णांसाठी सहा बेड भेट देण्यात आले.

मुसळगाव ग्रामपंचायत विलगीकरण कक्षास सहा बेड भेट देताना रोटरी क्लबचे संजय आव्हाड, किरण डावरे, उदय गायकवाड, चैतन्य कासार, अनिल सांगळे, नाना भगत, निशांत लंका आदी पदाधिकारी.
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरोना विलगीकरण कक्षास रोटरी क्लब सिन्नरच्या वतीने रुग्णांसाठी सहा बेड भेट देण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय आव्हाड, सचिव किरण डावरे, उदय गायकवाड, चैतन्य कासार, नाना भगत, निशांत लंका व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. मुसळगावातील ज्या कोरोना रुग्णांना घरी विलगीकरणाची व्यवस्था नसेल अशा नागरिकांसाठी येथील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची गरज ओळखून ह्यरोटरीह्णचे अनिल सांगळे, माजी उपसरपंच रवींद्र शिंदे यांच्या पाठपुराव्याने रोटरी क्लब सिन्नरच्यावतीने सहा बेड भेट देण्यात आले. यावेळी वसंत गोसावी, उपसरपंच अनिल सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे, दत्तू ठोक, वामन सिरसाट आदी उपस्थित होते.