नाशिक बाजार समिती निवडणुकीसाठी ५६% मतदान
By श्याम बागुल | Updated: April 28, 2023 13:48 IST2023-04-28T13:46:00+5:302023-04-28T13:48:32+5:30
सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य गटातील मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे दोन्ही बाजुंकडून काही दिवसांपुर्वीच समर्थक मतदारांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले होते.

नाशिक बाजार समिती निवडणुकीसाठी ५६% मतदान
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी शुक्रवारी (दि.२८) शांततेत मतदानाला सुरूवात होवून दुपारी बारा वाजेपर्यंत सोसायटी गटासाठी ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ग्रामपंचायत गटात अवघे ३७ टक्के मतदान नोंदविले गेले.
या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे महाविकास आघाडीचे ‘आपलं पॅनल’ तर माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’मध्ये लढत होत आहे. सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य गटातील मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे दोन्ही बाजुंकडून काही दिवसांपुर्वीच समर्थक मतदारांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी आठ वाजता नाशिक, त्र्यंबकेश्वर व पेठ या तीन तालुक्यातील सात मतदान केंद्रावर मतदानास सुरूवात होताच मतदारांना खासगी वाहनाने थेट मतदान केंद्रावरच आणण्यात आले.