मनपा हद्दीत कोरोनाचे ५४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 01:48 IST2022-07-11T01:47:58+5:302022-07-11T01:48:15+5:30
कोरोनाची रुग्णसंख्या शंभरीपार झाल्याने चिंता वाढलेली असताना, रविवारी कोरोना रुग्णसंख्या ८० आल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, नाशिक महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी मनपा हद्दीत ५४ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ५८ रूग्ण बरे होऊन घरी परतले.

मनपा हद्दीत कोरोनाचे ५४ रुग्ण
नाशिक : कोरोनाची रुग्णसंख्या शंभरीपार झाल्याने चिंता वाढलेली असताना, रविवारी कोरोना रुग्णसंख्या ८० आल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, नाशिक महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी मनपा हद्दीत ५४ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ५८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या ४२१ इतकी झाली आहे. शनिवारी जिल्ह्यातील कारोना रुग्णांचा आकडा शंभरीपार झाल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली असताना, रविवारी रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला. रुग्णसंख्या कमी अधिक होत असली, तरी ८० ते १०० च्या दरम्यान रुग्ण आढळत असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. नाशिक मनपा हद्दीत ५४, नाशिक ग्रामीण १८, तर जिल्हाबाह्य विभागात ८ रुग्ण आढळून आले. मालेगावमध्ये एकही रुग्ण आढळला नसल्याची नोंद झाली. शनिवारी मालेगावात ६ रुग्ण आढळून आले हेाते. नाशिक मनपाच्या तुलनेत मालेगावची रुग्णसंख्या अत्यंत कमी दिसत आहे.