गोळशी फाटा शिवारात 53 लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:20 IST2020-12-26T17:19:30+5:302020-12-26T17:20:10+5:30

दिंडोरी : तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक- पेठ रस्त्यावरील झालेल्या कारवाईत दिंडोरी पोलिसांनी 53 लाखाचा गुटख्यासह 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

53 lakh gutkha seized in Golshi Fata Shivara | गोळशी फाटा शिवारात 53 लाखाचा गुटखा जप्त

गोळशी फाटा शिवारात 53 लाखाचा गुटखा जप्त

ठळक मुद्देनाशिक- पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनिय माहिती

दिंडोरी : तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक- पेठ रस्त्यावरील झालेल्या कारवाईत दिंडोरी पोलिसांनी 53 लाखाचा गुटख्यासह 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नाशिक- पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनिय माहिती दिंडोरी पोलिसांना समजताच सापळा रचुन गोळशी फाटा शिवारात लाल रंगाची अशोक लेलन कंपनीची माल ट्रक क्रमांक (एमएच 56, 3814) या वाहनाचे विना परवाना बेकायदा अवैधरित्यापणे महाराष्ट्र शासनाने बंदी घाललेला सुंगधित गुटखा व सुंगधित पानमसाला तंबाखु तसेच गुटखा पावडर असा एकुण 53 लाख रुपयाचा गुटखा तयार करण्याचा माल सिलवासा येथून पेठमार्गे नाशिककडे घेऊन जात असताना स्वत: च्या कब्जा बाळगुन साठा करुन असुरक्षित आरोग्यास घातक तसेच अपायकारक अन्नपदार्थाची वाहतुक करताना मिळून आल्याने कर्नाटक राज्यातील दत्तात्रय रामलिंग जामदार (38) रा.मु.पो.सस्तापूर, ता. बसव,कल्याण, जि. बिलदर याच्या विरुध्द दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सचिन नवले तसेच पोलिस हवालदार धनंजय शिलवाटे, योगेंद्रसिंग राठोड, युवराज खांडवी, युवराज चव्हाण, मधुकर बेंडकूळे करीत आहे.

 

Web Title: 53 lakh gutkha seized in Golshi Fata Shivara