५२ नग जप्त : पेठ वनविभागाची कारवाई बाºहे परिसरात सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:09 IST2018-04-11T00:09:47+5:302018-04-11T00:09:47+5:30
पेठ : बाºहे प्रादेशिक वनविभागाने केलेल्या कारवाईत सागपाडा, ता. सुरगाणा येथील पांडू नामदेव जाधव याच्या राहत्या घरातून जवळपास १.१२० घ.मी. सागवानी लाकडाचे ५२ नग जप्त केले.

५२ नग जप्त : पेठ वनविभागाची कारवाई बाºहे परिसरात सागवान जप्त
पेठ : बाºहे प्रादेशिक वनविभागाने केलेल्या कारवाईत सागपाडा, ता. सुरगाणा येथील पांडू नामदेव जाधव याच्या राहत्या घरातून जवळपास १.१२० घ.मी. सागवानी लाकडाचे ५२ नग जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की, बाºहे वनपरिक्षेत्रातील सागपाडा येथील एका घरात चोरीचे मौल्यवान असे सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून त्या क्षेत्राचे वनपाल आर. एम. कुवर यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या घराची वनपाल ऐ. एम. साळवे, वनरक्षक गायकवाड, तुपलोंढे, न्हावकर, चव्हाण, पवार, खांडवी यांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून झडती घेतली असता घरामध्ये चौपाट सागवानी लाकडाचे ५२ नग मिळून आले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३० हजार रुपये आहे. त्याचा रितसर पंचनामा करून ते जप्त करण्यात येऊन आरोपी घरमालक पांडू नामदेव जाधव याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ४२ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बाºहे प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी करत आहे. पेठ तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या आंबे वनपरिक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चोरट्या तुटीवर नियंत्रण मिळविण्यास वनविकास महामंडळाला अपयश आलेले आहे; मात्र त्या आंबे वनपरिक्षेत्राच्या हद्दीला लागून असलेल्या बाºहे प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत त्यांनी दुसºयांदा या परिसरात कारवाई करून मौल्यवान साग ताब्यात घेतल्याने वनविकास महामंडळाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.