देवळालीगावात उभारली ५१ फूट गुढी; नववर्षानिमित्त स्वागतयात्रा
By Admin | Updated: March 29, 2017 23:36 IST2017-03-29T23:36:09+5:302017-03-29T23:36:29+5:30
नाशिकरोड : देवळालीगाव येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त गुढी सन्मानाची... नदी, नीर नारीची असा सामाजिक संदेश देणारी सार्वजनिक पारावर ५१ फुटी गुढी उभारण्यात आली होती.

देवळालीगावात उभारली ५१ फूट गुढी; नववर्षानिमित्त स्वागतयात्रा
नाशिकरोड : देवळालीगाव येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त गुढी सन्मानाची... नदी, नीर नारीची असा सामाजिक संदेश देणारी सार्वजनिक पारावर ५१ फुटी गुढी उभारण्यात आली होती. मराठी नववर्षाचे यावेळी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी व शिवकल्याणी महिला मंडळ यांच्या वतीने देवळालीगाव सार्वजनिक पार येथे गुढी सन्मानाची...नदी, नीर, नारीची असा सामाजिक संदेश देणारी ५१ फुटी गुढी उभारण्यात आली होती. तसेच मराठी नववर्षानिमित्त सार्वजनिक पार व महात्मा गांधी पुतळ्यासमोर आकर्षक भव्य रांगोळी काढण्यात आली होती. उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेविका सत्यभामा गाडेकर आदि मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन करून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ढोल व झांज पथकाने आपल्या कलाकारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर देवळालीगावातून ढोल-झांजच्या गजरात नववर्ष स्वागताची मिरवणूक काढून ११ मंदिरांवर उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन करण्यात आले. यामुळे सर्वत्र मराठमोळे वातावरण निर्माण झाले होते. आभार आयोजक नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी मानले. यावेळी नगरसेविका सुनीता कोठुळे, केशव पोरजे, सुधाकर जाधव, चंद्रकांत विसपुते, कैलास मोरे, श्रावण लांडे, प्रकाश गोहाड, शिरीष लवटे, नितीन चिडे, श्याम खोले, योगेश गाडेकर, सुनील देवकर, मसुद जिलानी, किरण डहाळे, योगेश शिंदे, विलास गिते, चंदू महानुभाव,
संदीप आहेर, भरत भोई, मंगेश लांडगे, शरद कोरडे, लंकेश गाडेकर, प्रमोद लोणकर, पप्पू नाईकवाडे, रत्नाकर शहाणे, रेणुका वंजारी, अनुराधा गारूडे आदि उपस्थित होते. देवळाली कॅम्प येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी सकाळी नव्या बसस्थानकापासून काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेचे नारायणदास चावला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. स्वागतयात्रेच्या अग्रभागी विठ्ठलाची पालखी व विद्यार्थी राम-लक्ष्मण-सीता, हनुमान, ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम, जिजाऊ, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आदि राष्ट्रपुरुषांचे पेहराव करून सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, खंडेराव महाराज, पोतराज वेशभूषेतील विद्यार्थी घोड्यावर स्वार झाले होते. शोभायात्रेत महाराज कृष्ण बिरमानी, एकनाथ शेटे, शीतलदास बालानी, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, रतन चावला, तानाजी करंजकर, चंद्रकांत गोडसे, प्रशांत बोंबले, प्रवीण पाळदे, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम टाकळकर, हरिष कटारिया, विलास कुलकर्णी, मृत्युंजय कापसे, प्रदीप गुरव, श्याम कृष्णानी, सुदाम झाडे, पल्लवी चव्हाणके, संगीता नाणेगावकर, छाया हाबडे, अंजली ठाकरे, प्रिया वावीकर आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)