शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

गोल्फ क्लबवर ५१ फे-या मारत आरतीने गुरू रंजय यांना दिली श्रध्दांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:22 PM

‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबईमध्ये या थर्टी फर्स्टला केला जाणार होता; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांचे अकाली निधन झाले.

ठळक मुद्देत्रिवेदी यांनी २०१३ सालापासून एक नवा पायंडा शहरात पाडला होतारविवारी (दि.३१) दुपारी चार वाजेपर्यंत ५१ फे-या तिने पूर्ण केल्या. आपल्या गुरूंच्या स्मृतींना आरतीने त्यांच्याच उपक्रमाची पुनरावृत्ती करत आगळी श्रध्दांजली वाहिली.

नाशिक : भोसला सैनिकी महाविद्यालयात शिकणारी आरती निशात ही मॅरेथॉनपटू स्वर्गीय रंजय त्रिवेदी यांची विद्यार्थिनी आहे. तिने नववर्षाच्या प्रारंभी रविवारी (दि.३१) गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर सलग आठ तास चालत ५१ फे-या पूर्ण करुन त्रिवेदी यांना आगळी श्रध्दांजली दिली.रंजय त्रिवेदी हे दरवर्षी तरुणाईला व्यसनमुक्ती आणि सुदृढ आरोग्याचा संकल्प करण्याचा संदेश सलग शेकडो तास चालून नववर्षाच्या प्रारंभी देत होते; मात्र यावर्षी त्यांचा हा संदेश आरतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नाशिककरांना दिला.मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव असलेली आरती ही त्रिवेदी यांची विद्यार्थिनी आहे. विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासाठी आरतीला त्यांच्याकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिले. त्यामुळे आपल्या गुरूंच्या स्मृतींना आरतीने त्यांच्याच उपक्रमाची पुनरावृत्ती करत आगळी श्रध्दांजली वाहिली.‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबईमध्ये या थर्टी फर्स्टला केला जाणार होता; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांचे अकाली निधन झाले.त्रिवेदी यांनी २०१३ सालापासून एक नवा पायंडा शहरात पाडला होता. नववर्षाचे स्वागताच्या औचित्यावर ते सलग कान्हेरे मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर फे-या मारत होते.२०१३ साली त्यांनी सलग २४ तास पायी चालून एक विक्रम नोंदविला होता. तसेच २०१४साली थर्टी फस्टला १०० तास तर २०१५मध्ये सहा दिवस-रात्र (१४४) तास चालण्याचा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला होता आणि २०१६च्या थर्टी फर्स्टला त्यांनी सलग दोनशे तास चालण्याचा संकल्प सोडला आणि ९ जानेवारी २०१७ रोजी त्यांनी तो पूर्ण केला होता. यावर्षी त्रिवेदी यांचा मुंबईमध्ये थर्टी फर्स्ट रोजी वांद्रे ते गेटवे आॅफ इंडियापर्यंत सलग ४८ तास चालण्याचा मानस होता; मात्र त्यापुर्वी त्यांचे दुर्देवी निधन झाले. आरतीने त्यांच्या सहा वर्षापासूनचा उपक्रमाचा विसर नाशिककरांना पडू दिला नाही. सलग नऊ तास पायी जॉगिंंकट्रॅकवर चालून रविवारी (दि.३१) दुपारी चार वाजेपर्यंत ५१ फे-या तिने पूर्ण केल्या. 

टॅग्स :NashikनाशिकNew Yearनववर्षNew Year 2018नववर्ष २०१८