कॉलेजरोडला ५० हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:28 IST2021-04-13T22:55:26+5:302021-04-14T01:28:47+5:30
नाशिक : कॉलेजरोड येथे चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

कॉलेजरोडला ५० हजारांची घरफोडी
ठळक मुद्देखिडकीचे गज कापून घरफोडी केली.
नाशिक : कॉलेजरोड येथे चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
अमर विजयकुमार बंग (रा. कामटवाडे) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने सोमवारी सकाळी श्रीराम धुनी सोसायटीतील त्यांच्या सदनिकेच्या यल खिडकीचे गज कापून घरफोडी केली.
चोरट्याने तेथून रोकड व किमती ऐवज लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.