रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:08+5:302021-06-17T04:11:08+5:30
यावेळी खासदार गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर ...

रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्तसंकलन
यावेळी खासदार गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,
माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, महेश बिडवे, नगरसेवक सुनील गोडसे, उपमहानगर प्रमुख दत्ता दंडगव्हाळ, माजी नगरसेवक राजेंद्र देसाई, शाेभा दोंदे, सुभाष शेजवळ, विभागप्रमुख नीलेश साळुंखे, संदीप गीते, आदींच्या हस्ते रक्तदात्यांचा व वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, पत्रकारांचा काेराेना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. शिबिर आयोजक अवजड वाहतूक सेना उपाध्यक्ष संजय गायकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन श्वेता लासुरे हिने केले. आभार प्रदर्शन प्रमोद लासुरे यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी अर्पण रक्तपेढीचे डॉक्टर व अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी विश्वास ताबे, राहुल वाजे यांसह ऋषी वर्मा, अमोल जाधव, सरबजितसिंग बल, सुभाष कडलग, आदित्य दुसाने, आदींसह शिवसैनिक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.