शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्कापासून ५० टक्के विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:59 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्टा प्रवेशप्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून, किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमुळे जिल्हाभरातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षातही १३०० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही.तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १,२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्हजिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार २७१ विद्यार्थ्यांचीच प्रवेशासाठी निवड झाली होती. उर्वरित ७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना चार फेºयांमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली नाही. अशा िस्थितीत तब्बल १३०० जागा रिक्त राहिल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे, तर आगामी वर्षात आपल्यांना आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांकडून आरक्षित जागा रिक्त असूनही मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.आरटीई अंतर्गत वर्षनिहाय प्रवेशशैक्षणिक वर्ष शाळांची संध्या उपलब्ध जागा प्रत्यक्ष प्रवेश२०१२-१३ २३८ ३७७९ ५०६२०१३-१४ २९२ ४६७३ ९४९२०१४-१५ ३३७ ५५३३ १३३०२०१५-१६ ३६७ ५८२७ २१५९२०१६-१७ ३७२ ५९०० २१५७२०१७-१८ ४५८ ६४३३ ३६४६

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक