येवल्यातील ५ अहवाल पॉझीटीव्ह; ३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:04 IST2020-08-17T20:19:29+5:302020-08-18T01:04:20+5:30

येवला : तालुक्यातील ५ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील १६ संशयितांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट केल्या. यात ५ अहवाल पॉझीटीव्ह आणि ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सोमवारी, (दि. १७) ३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

5 positive reports from Yeola; 3 corona free | येवल्यातील ५ अहवाल पॉझीटीव्ह; ३ कोरोनामुक्त

येवल्यातील ५ अहवाल पॉझीटीव्ह; ३ कोरोनामुक्त

ठळक मुद्देनगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ६ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क
येवला : तालुक्यातील ५ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील १६ संशयितांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट केल्या. यात ५ अहवाल पॉझीटीव्ह आणि ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सोमवारी, (दि. १७) ३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
बाधितांमध्ये शहरातील माऊली लॉन्स परिसरात ५५ वर्षीय पुरूष, गंगादरवाजा भागातील २४ वर्षीय पुरूष, तालुक्यातील तळवाडे येथील एकाच कुटुंबातील ६५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. याबरोबरच नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून २ तर नाशिक रूग्णालयातून एक असे ३ बाधित कोरोनामुक्त होवून सोमवारी (दि. १७) घरी परतले आहेत.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २७५ झाली असून आजपर्यंत २३६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या १९ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ८, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात ५ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ६ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.

Web Title: 5 positive reports from Yeola; 3 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.