नाशिक जिल्ह्यात नवीन ५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:22 IST2020-04-30T23:21:58+5:302020-04-30T23:22:21+5:30
नाशिक : मालेगावी गुरुवारी आणखी पाच नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने संकट कायम आहे. बाधितांची संख्या २८१वर पोहोचल्याने जिल्ह्याने रुग्णसंख्येत त्रिशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.

नाशिक जिल्ह्यात नवीन ५ पॉझिटिव्ह
नाशिक : मालेगावी गुरुवारी आणखी पाच नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने संकट कायम आहे. बाधितांची संख्या २८१वर पोहोचल्याने जिल्ह्याने रुग्णसंख्येत त्रिशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा ८२ बाधित आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यात पुन्हा ५ नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २८१वर पोहोचली असून, त्यात मालेगावच्या २५८ बाधितांचा समावेश आहे. मालेगावात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे.
---------
मालेगावी पोलीस विभागाने बंदोबस्त आराखडा तयार करताना सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्रिस्तरीय रचना करत बंदोबस्त आणखी कडक केला आहे.
वणी येथून राजस्थानला जाणाऱ्या ३९ परप्रांतीयांना गुरुवारी क्वॉरंटाइन करण्यात आले. नाकाबंदीदरम्यान दिंडोरी पोलिसांनी आंबे हीललगत त्यांना ताब्यात घेतले.
येवल्यात रुग्णसंख्या वाढल्याने ६५ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, १७४ व्यक्तींना होम क्वॉरंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.