नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ३) एकूण ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४९ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ३७८ वर पोहोचली आहे. दरम्यान प्रलंबित अहवाल बऱ्यापैकी प्राप्त झाल्याने प्रलंबित अहवालांची संख्या घटून १५ वर आली असून हे सर्व अहवाल नाशिक मनपा क्षेत्रातील आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेचा दर ९८.०६ टक्के असून पॉझिटीव्हीटी रेटमध्ये अल्पशी घट येऊन तो २.६१ टक्के झाला आहे.
४९ बाधित; ४३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 01:39 IST