जिल्ह्यात ४,८३८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:53 IST2021-05-03T01:52:49+5:302021-05-03T01:53:36+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि.२) एकूण ३,६९१ इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर सुमारे दुप्पट   म्हणजे ४,८३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,५६८ वर पोहोचली आहे.

4,838 corona free in the district | जिल्ह्यात ४,८३८ कोरोनामुक्त

जिल्ह्यात ४,८३८ कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि.२) एकूण ३,६९१ इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर सुमारे दुप्पट   म्हणजे ४,८३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,५६८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,१७९ तर नाशिक ग्रामीणला १,३७२१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ४० व जिल्हाबाह्य १०० रुग्णबाधित आहेत.
उपचारार्थी ३६ हजारांवर 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग पाचव्या दिवशी अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३६,९०६ वर पोहोचली आहे. त्यात १९ हजार ३५६ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ५८१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ७०७ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २६२ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 4,838 corona free in the district