शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शहरात ४४ नवे कोरोना रूग्ण; जुन्या नाशकातील माजी नगरसेवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:37 IST

इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता २९ ग्रामिण भागात आज १३ रूग्ण आढळून आले आहेतजिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू; एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ११८

नाशिक : शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.१३) दिवसभरात नवे ३७ रूग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात एकूण ५१ रुग्ण नव्याने मिळून आले. यामध्ये मालेगावमधील ४ नाशिक ग्रामीणमध्ये १३ नवे रूग्ण मिळून आले. जुने नाशिकमधील एका माजी नगरसेवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला. शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता २९ झाली आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहर पोलीस दलातसुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपुर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला होता, त्याचा उपचारादरम्यान दोन दिवसांपुर्वीच पुन्हा कोरोना नमुना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.

नाशिक शहरात करोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या १ हजार ८६८ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात ३७ रु ग्ण करोनामुक्त झाल्याने करोनावर मात क रणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात १ हजार २२९ वर पोहचली आहे.आज दिवसभरात जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये केवळ नाशिक शहरातील ४४ रु ग्ण आढळून आले आहेत. यात फुलेनगर-३, पेठरोड-३ , खडकाळी-४, कथडा-२, कालिकानगर-३, पखालरोड-२, जुने नाशिक-२ गंजमाळ, चौक मंडई, अमृतधाम, साईधामरोड, मायको सर्कल, सारडा सर्कल, त्र्यंबकदरवाजा, रविवार कारंजा, नवरंग कार्यालय, हनुमानवाडी, रोहिणीनगर, येथील प्रत्येकी१ या प्रमाणे कोरोनाचे नवे रु ग्ण आढळून आले आहेत. प्रामुख्याने जुने नाशिकचा मोठा परिसर करोना संसर्गाने व्यापला आहे. तर रविवार कारंजा, मेनरोड अशा मुख्य बाजार पेठेतील रु ग्ण आढळल्याने या भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामिण भागात आज १३ रूग्ण आढळून आले आहेत. यात येवला येथील ६, सिन्नर दोडी १, लखमापुर १, ओढा १, भगुर १ येथील असून यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ३१९ झाला आहे. तर जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ११८ वर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात आज ३७ रु ग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू