शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नाशिक जिल्ह्यातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 6:53 PM

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प्रथमच प्रत्येकी दीड तासांच्या बहुपर्यायी स्वरुपातील दोन प्रश्नप्रत्रिका सोडवाव्या लागल्या

ठळक मुद्देपाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा यंदा विद्यार्थ्यांनी सोडवले तीन एेवजी दोन पेपरगणित वगळता परीक्षा सोपी, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

नाशिक : प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. यात पाचवीतील 24 हजार 122 व आठवीतील 19 हजार 51 विद्याथ्यार्ंनी ही परीक्षा दिली असून दोन्ही गटातील परीक्षा गणीत विषय वगळता परीक्षा अतिशय सोपी गेल्याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प्रथमच प्रत्येकी दीड तासांच्या बहुपर्यायी स्वरुपातील दोन प्रश्नप्रत्रिका सोडवाव्या लागल्या. सकाळी साडेआकरा वाजता पहिल्या सत्रात प्रथम भाषा व गणित विषयाचे पेपर झाले. तर दुसऱ्या सत्रात दिड ते तीन वाजेच्या कालावधीत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर झाले. दुसऱ्या सत्रातील गणित विषयाच्या पेपरमध्ये काही अवघड प्रश्न कठीण पातळीचे होते. तर बुध्दीमत्ता व सर्वसामान्य ज्ञानाची प्रश्नपत्रीका सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सोपी गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. परीक्षेसाठी 24 हजार 122 विद्यार्थी हजर होते. तर 636 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली तर आठवीच्या 18 हजार 566विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका मिळाल्याने एमपीएससी स्पर्धा परीक्षांप्रमाणो विद्यार्थ्यांना उत्तर पत्रीका सोबत मिळाली. शिष्यवृत्ती पात्रतेसाठी या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणो आवश्यक आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शहरातील डी. डी. बिटको हायस्कूल, मराठा हायस्कूल, अभिनव बाल विकास मंदीर, होरायझन शाळेतील परीक्षा केंद्रांना भेट दिली. जिल्हा समन्वयक म्हणून प्रमोद चिंचोले, सी. बी. गवळी, उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणो यांनी जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी