नाशिकमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ४१८ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप
By नामदेव भोर | Updated: July 17, 2023 16:19 IST2023-07-17T16:19:16+5:302023-07-17T16:19:35+5:30
गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांच्या लाभांर्थांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ४१८ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप
नाशिक : नाशिक जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत विविध बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांतर्गत जवळपास ६ हजार ३७२ युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून एकूण कर्ज वितरण ४१८ कोटी ६२ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांच्या लाभांर्थांचा समावेश आहे.
मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा परतावा दिला जातो.
नाशिक जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत विविध बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांतर्गत जवळपास ६ हजार ३७२ युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून एकूण कर्ज वितरण ४१८ कोटी ६२ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांच्या लाभांर्थांचा समावेश आहे, तर आतापर्यंत एकूण ४९ कोटी ७८ लाख रुपयांचा व्याज परतावा वेगवेगळ्या बँकांना देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. आर्थिक मागास समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.