भाभानगरमध्ये दोन घरफोड्यांत ४१ हजारांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:04+5:302021-01-13T04:35:04+5:30
नितीन मधूकर मोरे (रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे यांचे भाभानगर येथील तिरूपती अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. ...

भाभानगरमध्ये दोन घरफोड्यांत ४१ हजारांचा ऐवज लुटला
नितीन मधूकर मोरे (रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे यांचे भाभानगर येथील तिरूपती अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. गुरूवारी (दि.७) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद कार्यालयाचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप,तीन मोबाईल, गॅस स्टोव्ह आणि ब्ल्यू ट्युथ हेडफोन असा सुमारे २६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना याच भागातील शमा व्हिला या बंगल्यात घडली. आशितोष दिलीप कुचेरीया यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुचेरीया यांचे ज्योती इंटरप्रायझेस नावाचे गोडावून शमा व्हिला या बंगल्यात आहे. गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप,सीसीटिव्ही कॅमेºयांचा डिव्हीआर तसेच २० हजाराची रोकड असा सुमारे ४८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.