शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:08 PM

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे.

ठळक मुद्देशहरी भागातही लोण : आदिवासी विभागात समस्या गंभीर

नाशिक : जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना आता शहरी व सुखवस्तू भागातही कुपोषित बालके आढळून आल्याने आरोग्य व महिला, बाल कल्याण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.नाशिक जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असून, या भागातील नागरिक शेती व शेतमजुरीवर अवलंबून असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही पोटभर अन्नपाणी मिळण्यापेक्षाही आरोग्याविषयी अनास्था, अल्पवयात लग्न व गर्भारपण व त्यातूनच कुपोषित बालकांना जन्म देण्याचे प्रमाण अधिक आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी करावे लागणारे स्थलांतर, आरोग्य सुविधांचा अभाव या गोष्टीही कुपोषणाला पूरक ठरल्या आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न करूनही आदिवासी भागात कुपोषित बालकांना जन्म देण्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नसला तरी, आरोग्य विभाग व महिला-बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कमी वजनाच्या बालकांचे वजन वाढविण्यात यश मिळाले आहे. मात्र पूर्वी फक्त आदिवासी भागापुरताच मर्यादित असलेला कुपोषणाचा विळखा आता बिगर आदिवासी तालुके व शहरी भागालाही बसू लागला आहे. डिसेंबर महिन्यात बिगर आदिवासी तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील ३ लाख १८ हजार ६६० बालकांच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या ३७८६६ इतकी होती तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या १०१५६ इतकी राहिली. मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २८२४ इतकी आहे तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ६६३ इतकी आहे. आदिवासी क्षेत्रातील एक लाख ५६ हजार ७१८ बालकांपैकी एक लाख ५० हजार ९८१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २४२१६ इतकी असून, तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ६९४८ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०३८ इतकी आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४७८ इतकी असून, आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यातील बालकांची एकूण संख्या पाहता सुमारे २२ हजार बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता कमी वजनाच्या बालकांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, याशिवाय अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार व आशा कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवून त्यांचे वजन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.शहरी भागाला विळखाजिल्ह्णातील बिगर आदिवासी तालुक्यांमध्येही कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून, सर्वाधिक कुपोषित बालके नांदगाव तालुक्यात ४९८ इतकी आढळली आहेत. त्याखालोखाल बागलाण (३५९), मालेगाव (३३६), चांदवड (२९०), निफाड (२६४), मनमाड (२५५) बालके कुपोषित आढळून आली आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाfoodअन्न