जूनच्या मध्यावर नाशिकमधील धरणांमध्ये ४० टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:37 IST2020-06-16T23:03:51+5:302020-06-17T00:37:07+5:30
नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.

जूनच्या मध्यावर नाशिकमधील धरणांमध्ये ४० टक्के साठा
नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.
यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पहायला मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे, तर तत्पूर्वी निसर्ग
चक्रीवादळामुळेदेखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. खरिपाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून अनुकूल असल्याने पुढील आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागल्याने जिल्ह्याची परिस्थिती बिकट होती. जिल्ह्यातील सहा तालुके शासनाने दुष्काळी म्हणून जाहीरही केले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साहजिकच धरणांमधील साठाही मर्यादित होता. यावरून राजकीय वातावरणही तापले होते.
मागीलवर्षी मात्र वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने नाशिकमधील धरणे १०० टक्के भरलीच शिवाय मराठवाडाचादेखील पाणीप्रश्न सुटला.
मागीलवर्षीच्या पाणी साठ्यामुळे यंदा जूनच्या मध्यावरच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असून, पाच धरणे ४० टक्क्यांच्या पुढे तर उर्वरित धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे.
-------------------
मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर धरणांची पातळी लवकर वाढण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर, ओझरखेड, दारणा, नांदुरमधमेश्वर, हरणबारी आणि पूनद या प्रकल्पांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणांमधील पाणीसाठा आणि एकूणच अनुकूल पावसाचा परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने नियोजनदेखील केले आहे.