येवल्यात ४० जण पॉझिटिव्ह; विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST2021-03-19T04:14:55+5:302021-03-19T04:14:55+5:30
येवला शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयितांच्या चाचण्या केल्या जात आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य ...

येवल्यात ४० जण पॉझिटिव्ह; विलगीकरण कक्ष सुरू
येवला शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयितांच्या चाचण्या केल्या जात आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण उपकेंद्र अशा सहा ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेतल्या जात आहेत. या केंद्रावर गुरुवारी १७० रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ४० जण पॉझिटिव्ह आले असून यात येवला तालुक्यातील ३१ जणांचा समावेश आहे. यावेळी ११९ स्बॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी १२ पथके निर्माण करण्यात आली आहेत. एका पथकात ४ शिक्षक, एक नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
इन्फो...
१२६३ रुग्ण बरे
येवला तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १४९२ झाली असून ५४ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत १२६३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.