उपनगर पोलिसांकडून ४ लाखांचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST2021-04-06T04:13:40+5:302021-04-06T04:13:40+5:30
नाशिकरोड : कोरोनाचा संसर्ग वाढला असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही, अशा लोकांना जरब ...

उपनगर पोलिसांकडून ४ लाखांचा दंड वसुल
नाशिकरोड : कोरोनाचा संसर्ग वाढला असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही, अशा लोकांना जरब बसविण्यासाठी उपनगर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गेल्या महिनाभरात चार लाखांचा दंड वसूल केला आहे.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत विनामास्क वावरताना आढळलेल्या ३८४ व्यक्तींवर कारवाई करत १ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा दंड तर सोशल डिस्टन्सिंग आणि आस्थापनांवरील कारवाईतून २ लाख ३९ हजार रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या पाचजणांकडून पाच हजारांचा असा एकूण ३ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या ११५ लोकांना बिटको रुग्णालयात नेवून कोविड चाचणी केली असता, दोघांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. गांधीनगर भाजी मार्केट सील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.