आॅलिंिम्पयाडमध्ये रासबिहारीला ४ सुवर्ण
By Admin | Updated: January 18, 2015 01:26 IST2015-01-18T01:25:56+5:302015-01-18T01:26:54+5:30
आॅलिंिम्पयाडमध्ये रासबिहारीला ४ सुवर्ण

आॅलिंिम्पयाडमध्ये रासबिहारीला ४ सुवर्ण
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या आॅलिम्पियाड गणित व इनफोंरमॅटिक्स परिक्षेत रासबिहारी स्कूलला ४ सुवर्ण पदकांसह १२ पदकांची कमाई झाली़ या परिक्षेत शहरातील विविध विद्यालयांच्या मुलांनी सहभाग घेतला होता़ रासबिहारीच्या पार्थ लोहकरे, सिद्धान्त देवरे, भावेश शेलार या विद्यार्थ्यांनी गणित परीक्षेत सुवर्ण पदके पटकावली़ तर इनफोंरमॅटिक्समध्ये देवेन नेहते या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावले़ तर इतर विद्यार्थ्यांनी ४ रजत व ४ कांस्य पदके मिळवली़ आॅलिम्पियाडची द्वितीय पातळी परीक्षेसाठी सुवर्णपदक विजेते विद्यार्थी पात्र झाले आहेत़ ही परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे.