शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात लसीकरणाचा ४ दिवसांचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:07 PM

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही.

ठळक मुद्देलसीकरणासाठी रांगा

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लस कितपत उपलब्ध होईल, त्याची माहितीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्याला गत आठवड्यात १ लाख ९० लसींचा साठा उपलब्ध झाला होता. या साठ्यातून दिवसाला १६ हजार ते २० हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे सहा दिवसांत सुमारे १ लाखाहून अधिक लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. अशा परिस्थितीत आता सध्याच्याच प्रमाणात लसीकरण सुरु ठेवल्यास ही लस रविवार किंवा सोमवारपर्यंतच पुरू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा त्वरित लस उपलब्ध झाली तरच लसीकरण सुरळीत सुरू राहू शकणार आहे. अन्यथा अन्य जिल्ह्यांप्रमाणे पुन्हा नाशिकलादेखील लसीकरणात खंड पडण्याची भीती व्यक्त होत आहे.लसीकरणासाठी रांगाकोरोनाच्या वाढत्या प्रकोपाकडे पाहून घाबरलेल्या नागरिकांनी आता लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दृश्य सर्वच लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहे. नागरीक नोंद केल्यानंतर सकाळी लवकरच रांगेत उभे राहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. तर ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकदेखील दुसऱ्या लसीसाठी घाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस