३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: October 18, 2016 01:30 IST2016-10-18T01:22:26+5:302016-10-18T01:30:02+5:30

चोंढी घाट शिवार दरोडा

37 lakh worth of money seized | ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 मालेगाव : मालेगाव - मनमाड रोडवर चोंढी घाट शिवारात दरोडा टाकून कंटेनरसह १७४ एलईडी टीव्ही चोरून नेणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना तालुका पोलिसांनी हरियाणा व राजस्थान येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ३७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारात फिर्यादीच संशयित आरोपी म्हणून समोर आला आहे. गेल्या १८ सप्टेंबर रोजी मालेगाव-मनमाड रोडवर चोंढी घाट शिवारात रस्ता लुटीचा धाडसी प्रकार घडला होता. याप्रकरणी जमशेद सुलेमान अन्सारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. फिर्यादी जमशेद हाच संशयित आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे संशयित आरोपींचा शोध घेतला होता. पलवेल (हरियाणा) येथून जमशेद सुलेमान अन्सारी व परमानंद किशोर या दोघांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: 37 lakh worth of money seized