येवल्यात स्वामी समर्थ केंद्राच्या दानपेटीतून ३५ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:15 IST2020-08-25T20:45:02+5:302020-08-26T01:15:21+5:30
येवला : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये लांबविले आहेत.

येवल्यात स्वामी समर्थ केंद्राच्या दानपेटीतून ३५ हजारांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये लांबविले आहेत.
शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास तिघा चोरट्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या दरवाजाचे कडीकोंडे तोडून आतील मंदिरातील दानपेटीचे कुलुप तोडून त्यातून नोटा-चिल्लर अशी ३५ हजार रूपयांची रोकड चोरून पलायन केले. या प्रकरणी दत्तात्रय बाळकृष्ण जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे करत आहेत.