शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तपोवन परिसरात  ३४ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:20 IST

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी (दि़ १२) दुपारी छापा टाकून भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची वाहतूक करणारा आयशर पकडला असून, या वाहनातून ३४ लाख रुपये किमतीचा ६७० किलो गांजा जप्त केला आहे़

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी (दि़ १२) दुपारी छापा टाकून भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची वाहतूक करणारा आयशर पकडला असून, या वाहनातून ३४ लाख रुपये किमतीचा ६७० किलो गांजा जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित यतिन अशोक शिंदे (३५, रा़ प्रभातनगर, श्रीगणेश अपार्टमेंट, म्हसरूळ) व सुनील नामदेवराव शिंदे (४७, रा़ मिरचीची पालखेड, ता़ जि़ नाशिक) या दोघांना अटक केली असून, हा गांजा कोठून आणला व त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा पोलीस शोध घेत आहेत़  गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना ओडिसा येथून एका आयशरमध्ये बाराशे किलो गांजा येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर,  गुन्हे शोध पथकाचे प्रवीण कोकाटे, वसंत पांडव आदींसह कर्मचाऱ्यांनी तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात सापळा रचला होता़  शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आयशर (एमएच १२ इक्यू १४२९) वाहनास अडवून त्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले़ या वाहनाची तपासणी केली असता भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाºया प्लॅस्टिक क्रेटच्या पाठीमागे गोण्यांमध्ये गांजा भरलेला होता़ पोलिसांनी या गांजाचे वजन केले असता ते ६८४ किलो भरले़ ३४ लाख रुपये किमतीचा गांजा व १५ लाख रुपये किमतीचा आयशर असा ४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, तपोवनातील वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़हा गांजा कोणासाठी ?तपोवन परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कोणी मागविला? या परिसरातील साधू-महंतांसाठी तर हा गांजा आणला गेला नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा होती़ तसेच हा गांजा तपोवनातून भद्रकाली, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड आदी शहरातील प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी आणल्याची परिसरात चर्चा होती़उर्वरित माल कुठे उतरविला का?गुन्हे शाखेच्या युनिट एकला शहरात बाराशे किलो गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती़ मात्र, पोलिसांनी पकडलेला गांजा हा केवळ ६८० किलो असल्याने उर्वरित ५२० गांजा कोठे गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ उर्वरित गांजा हा संशयितांनी कुठे विक्री केला का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत़ तसेच आयशर वाहनाचा असलेला नंबरही बनावट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़काळ्या बाजारात गांजा १० हजार रुपये किलोपोलिसांनी पकडलेल्या गांजाची सरकारी किंमत पाच हजार रुपयांप्रमाणे ३४ लाख रुपये असली तरी रिटेल मार्केटमध्ये एक किलो गांजाची किमत दहा हजार रुपये इतकी आहे़ यापूर्वीही पोलिसांनी भद्रकाली तसेच पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात गांजा, चरस, भांग हे अमली पदार्थ पकडले होते़ तर काही दिवसांपूर्वीच एमडी नावाचा अमली पदार्थही पोलिसांनी पकडला होता़ या घटनांवरून नाशिक शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा