शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

शहरात आज ३३ कोरोनाबाधित; नाईकवाडीपुरा भागातील वृध्दाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 22:55 IST

शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४८७ वर. महापालिका हद्दीतील १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन उपचारानंतर घरी गेले आहेत...

ठळक मुद्देमहात्मानगर या उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होत आहे

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी (दि.८) नवे २८ रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले. मंगळवारी (दि.९) यामध्ये अधिक वाढ झाली आणि मनपा हद्दीत रात्री दहा वाजेपर्यंत कोरोनाचे एकूण नवे ३३ रूग्ण आढळून आले. त्यापैकी जुन्या नाशकातील सहा रुग्ण आहेत. शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४८७ वर पोहचली आहे.जुन्या नाशकात मागील तीन दिवसांत या भागात तब्बल ४७ रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी सकाळी जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा परिसर संपुर्ण ‘सील’ केला गेला. महापालिका हद्दीत एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ९७ झाली आहे. जवळपास निम्मे शहर प्रतिबंधित म्हणून घोषित केले गेले आहे, तरीदेखील नागरिक तितक्याच मोठ्या प्रमाणात गरज नसतानाही सर्रासपणे घराबाहेर पडताना दिसून येत आहे.जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नाईकवाडीपुरा भागातील एका ७० वर्षीय वृध्दाचा कोरोना आजाराने बळी घेतला. या परिसराने अद्याप चार ते पाच रहिवाशी मागील आठवडाभरात कायमचे गमावले असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. जुने नाशिकमधील नाईकवाडीपु-यात मंगळवारी तीन तर आझाद चौक (चव्हाटा)-१, कोकणीपुरा-१, बागवानपुरा चौक-१, अमरधामरोड-१, भाभानगर-१, जयदीपनगर-१, पेठरोड-३, दिंडोरीरोड-१, महात्मानगर-१, टाकळीरोड-१, सरदार चौक (पंचवटी)- ३, नाग चौक (पंचवटी)-३, फुलेनगर-१, टाकळीरोड-२,काठेमळा (तपोवनरोड)- ३, सातपूर कॉलनी-३ असे रुग्ण आढळून आले. सोमवारी रविवारपेठेत तर मंगळवारी महात्मानगर या उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव झालेला पहावयास मिळाला. नाशिक शहरातील जवळपास सर्वच उपनगरामंध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सुदैवाने मागील चार ते पाच दिवसांपासुन वडाळागाव परिसरासह खोडेनगर या भागात नवे रुग्ण मिळून आलेले नाही.महापालिका हद्दीतील १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन उपचारानंतर घरी गेले आहेत तर सध्या २९७ रुग्ण उपचारार्थ विविध कोरोना कक्षांमध्ये दाखल आहेत. शहरात अद्याप २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ हजार ६८३ वर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात ४८८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोनाने १०२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस