ओझर परिसरातील ३३ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:16 IST2021-03-18T22:10:56+5:302021-03-19T01:16:19+5:30
ओझर टाऊनशिप : टाऊनशिपसह ओझर परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, गुरुवारी दिवसभरात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

ओझर परिसरातील ३३ बाधित
ओझर टाऊनशिप : टाऊनशिपसह ओझर परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, गुरुवारी दिवसभरात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्या असून, बाधित रुग्णाचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ओझर टाऊनशिपसह ओझर परिसरातील पॉझिटिव्ह आलेल्या ३३ रुग्णांमध्ये टाऊनशिपमधील ५ ,भगवती फर्निचर ३, तांबट लेन १, शिवाजी चौक ५, शेजवळवाडी १,कदम मळा १, मधला माळीवाडा ४, मरीमाता गेट १, सैनी धाबा ३, दत्तनगर ३, साईधाम ४ व पंचवडनगरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. आता ओझरसह परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या १४०७ झाली असून, त्यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. १२४६ रुग्ण बरे झाले असून १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनची संख्या ६५९ झाली असून, आता ॲक्टिव्ह झोन ८६ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी.. होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे व आरोग्य साहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.