जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

By Admin | Updated: March 30, 2017 00:56 IST2017-03-30T00:56:22+5:302017-03-30T00:56:37+5:30

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले

328 liquor shops will be closed in the district | जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने कायमची बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मार्चअखेर पाहता येत्या दोन दिवसांत ७९९ परवान्यांचे नूतनीकरण करावे लागणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आत असलेल्या सर्व प्रकारच्या मद्यविक्रीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिल्याने जिल्"ातील सुमारे ६० टक्के मद्यविक्रीच्या दुकानांवर गंडांतर आले होते. न्यायालयाचा आदेश असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क खात्याने राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांचे अंतरही मोजून घेतले. परंतु दोन आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्याने न्यायालयाने बिअरबार व रेस्टॉरंटला या निर्णयातून वगळले मात्र वाइन शॉप, बिअर शॉपी, देशी दारूच्या दुकानांना सूट देण्यास नकार दिल्याने नाशिक जिल्"ातील एकूण ११११ परवान्यांपैकी ३२८ मद्यविक्रीची दुकाने बंद होणार आहेत. सदर दुकाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या अंतरात थाटण्यात आली आहेत.  न्यायालयाचा निर्णय मात्र ७९९ रेस्टॉरंट व बिअरबारला लागू होणार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. बी.  आवळे- पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील व त्यानंतरच  परवान्यांचे नूतनीकरण करण्यात  येणार असल्याचे आवळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिक महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची मालकी त्या त्या यंत्रणेकडे असली तरी, त्याची देखभाल व दुरुस्ती महापालिका करीत असल्याने तसेच शहरी हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गाला पर्यायी नवीन मार्ग तयार झाल्याने जुन्या मार्गावरील दुकानांना न्यायालयाचा निर्णय लागू होण्याबाबतचा संभ्रमही दूर झाला असून, यासंदर्भात राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील अनेक दुकानांवर गंडांतर येणार आहे.

Web Title: 328 liquor shops will be closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.