कथडामध्ये ३१० दिव्यांगांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:01 IST2017-09-30T00:01:12+5:302017-09-30T00:01:12+5:30
नाशिक : महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांमार्फत विभागनिहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयोजित शिबिरात ३१० दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

कथडामध्ये ३१० दिव्यांगांची तपासणी
नाशिक : महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांमार्फत विभागनिहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयोजित शिबिरात ३१० दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
तपासणीसाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना कोणत्या स्वरूपाचा लाभ द्यायचा हेदेखील निश्चित करणेत आले. तसेच ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नव्हते अशा सर्वांना सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठविण्यात आले. तसेच सिडको आणि सातपूर विभागामध्येदेखील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.