शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

३१ संशयित निगेटीव्ह : नाशिककरहो...,पुढील १५ दिवस रहा अधिक ‘अ‍ॅलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 8:10 PM

पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे, कारण हा पंधरवडा जास्त धोक्याचा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून शहराची गल्लीबोळ पिंजून काढला जात आहे

ठळक मुद्देप्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटीव्ह अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटीव्ह खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त

नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) अधिकच दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच; मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटीव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटीव्ह आले असून ‘कोरोना’ विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोणा विषाणूने भारतासह महाराष्ट्र लाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्ट्र त आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरूस, सण-उत्सवांच्यानिमित्तानेही होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानी आली नसली तरी मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरुन नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे.

पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे, कारण हा पंधरवडा जास्त धोक्याचा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून शहराची गल्लीबोळ पिंजून काढला जात आहे. मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचा शहरी आरोग्य चमू कठोर परिश्रम घेत दैनंदिन सर्वेक्षणावर भर देत आहेत. सर्दी, खोकला, तीव्र ताप, उलट्या यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारार्थ सरकारी रुग्णालयांमध्ये पाठविले जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यSmart Cityस्मार्ट सिटी