नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) अधिकच दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच; मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटीव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटीव्ह आले असून ‘कोरोना’ विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोणा विषाणूने भारतासह महाराष्ट्र लाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्ट्र त आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरूस, सण-उत्सवांच्यानिमित्तानेही होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानी आली नसली तरी मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरुन नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे.
३१ संशयित निगेटीव्ह : नाशिककरहो...,पुढील १५ दिवस रहा अधिक ‘अॅलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 20:16 IST
पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे, कारण हा पंधरवडा जास्त धोक्याचा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून शहराची गल्लीबोळ पिंजून काढला जात आहे
३१ संशयित निगेटीव्ह : नाशिककरहो...,पुढील १५ दिवस रहा अधिक ‘अॅलर्ट’
ठळक मुद्देप्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटीव्ह अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटीव्ह खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त