जीप उलटल्याने ३१ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:58 IST2022-05-16T22:58:28+5:302022-05-16T22:58:58+5:30
नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या जीपला अपघात होऊन ३१ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारनंतर साडेचार वाजेदरम्यान उंबरठाण-वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली.

जीप उलटल्याने ३१ प्रवासी जखमी
नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या जीपला अपघात होऊन ३१ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारनंतर साडेचार वाजेदरम्यान उंबरठाण-वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रगतविहीर येथील वऱ्हाडी मंडळी जीपने (एमएच १५ पी ३५०४) मुलीच्या हळदी कार्यक्रमासाठी हातरुंडी येथे गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना सोनगीर फाट्याजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. त्यामध्ये या अपघातातील नऊ जखमींना गुजरातमधील वासदा येथील सरकारी रुग्णालयात, तीन जखमींना खासगी रुग्णालयात व पाच जखमींना बलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सात जण गंभीर असल्याचे समजते.
अपघातग्रस्त उलटलेले जीप वाहन.