कुसमाडी येथे ६५ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST2020-01-30T22:15:50+5:302020-01-31T01:03:01+5:30
कुसमाडी येथील टोपली-शिराई बनवून विकणाऱ्या शिरसाठ कुटुंबीयांच्या घरातून ६५ हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुसमाडी येथे ६५ हजारांची घरफोडी
येवला : तालुक्यातील कुसमाडी येथील टोपली-शिराई बनवून विकणाऱ्या शिरसाठ कुटुंबीयांच्या घरातून ६५ हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कुसमाडी येथील वृद्ध महिला कमळाबाई नाथजी शिरसाठ कुटुंबासह राहतात. चार दिवसांपूर्वी शिरसाठ कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरीची वार्ता शिरसाठ यांचे शेजारी राहुल सोनवणे यांनी फोन करून सांगितली. यानंतर घर गाठलेल्या शिरसाठ यांनी येवला तालुका पोलिसांत चोरीची फिर्याद फिली. पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पारखे तपास करीत आहेत.