३0 टवाळखोरांवर झाली कारवाई
By Admin | Updated: January 2, 2015 01:00 IST2015-01-02T01:00:16+5:302015-01-02T01:00:38+5:30
३0 टवाळखोरांवर झाली कारवाई

३0 टवाळखोरांवर झाली कारवाई
नाशिकरोड : परिसरात नववर्षाच्या स्वागताप्रसंगी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या तळीरामांसह एकूण ३० टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने काही अप्रिय घटना घडू नये म्हणून नाशिकरोड-उपनगर पोलिसांनी आपापल्या हद्दीतील चायनीज, अंडाभुर्जी, पावभाजी यांची दुकाने, टपऱ्या, हातगाडे न लागण्याची पूर्वकल्पना देत काळजी घेतली होती. यामुळे अधिकृत हॉटेल, बिअरबार वगळता टपऱ्या, हातगाडे, अनधिकृत दारू विक्रीची ठिकाणे बंद होती. रात्री दूधविक्री करणारे दुधवाल्यांचे हातगाडे, पानटपऱ्या या वेळेपूर्वीच बंद झाल्याने सर्वत्र शांततेत व उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
नाशिकरोड-उपनगर पोलिसांनी एकूण ११ तळीरामांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या १८ जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध दारूविक्री करणाऱ्या एकाजणावर तसेच ट्रिपलशीट दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांकडून एकूण १८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)