शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:26 IST

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.

नाशिक : मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.२ अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे नुकसानीत अधिकच भर पडली असून, अजूनही मोठ्या परिसरातील शेतीक्षेत्रावर पाणी साचल्याने पंचनामेदेखील रडखले आहेत.यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्टÑापुढे मोठा प्रसंग उभा राहिला होता. त्यातच जूनमध्ये मान्सूनने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे विभागातल अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढतच गेली. अनेक तालुक्यांमधून तर कृत्रिम पावसाचीदेखील मागणी पुढे येऊ लागली होती. जुलैच्या दुसºया आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे संपूर्ण चित्र बदलून गेले आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये शेतपिकांचे नुकसान अधिक असून, अद्यापही अनेक भागातील शेतीमध्ये पाणी साचले आहे. (पान ५ वर)त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्णात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील २२,३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्णात ८,१८५, नंदुरबारमध्ये १२,१५९, जळगावमध्ये १३,७४१ तर अहमदनगर येथील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून २७,४११ हेक्टर असे एकूण ८३,८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्णावर झाला असून नदीकाठावरील जनजीवन अद्यापही पूर्ववत होऊ शकलेले नाही.अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील लाभार्थी आणि बाधित गावांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नाशिक जिल्ह्णातील ३२ हजार ६४९, धुळे जिल्ह्णात ९,२२८, नंदुरबारमध्ये २०,२३७, जळगावमधील १०,३४४ आणि नगरमधील ४७,५९२ याप्रमाणे एक लाख २० हजार बाधित लाभार्थी असून १७१५ गावांमधील नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे...या पिकांचे झाले नुकसानसोयाबीन, कांदा, मका, बाजरी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आणि पडवळ ही पिके अतिवृष्टीत बाधित झालेली आहेत. विभागात ७७ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले असून ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची संख्या ५,८४७ हेक्टर इतकी आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेतीFarmerशेतकरी