शेतजमिनीच्या वादातून हाणामारी, २१ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:52 IST2019-11-18T15:51:47+5:302019-11-18T15:52:08+5:30
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतजमिनीच्या वादातून हाणामारी, २१ जणांवर गुन्हा
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हेर येथे प्रकाश नथू गायकवाड व गुलाब दौलत गायकवाड यांच्यातील शेतजमिनीच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून लाठ्या-काठ्यांसह गजाचा वापर करण्यात आला. एका गटातील जयराम शांताराम गायकवाड, पंढरीनाथ दौलत गायकवाड, गुलाब दौलत गायकवाड, हिरालाल पंढरीनाथ गायकवाड, शांताराम दौलत गायकवाड, राजेन्द्र दौलत गायकवाड, शांताबाई पंढरीनाथ गायकवाड, गिताबाई गुलाब गायकवाड, र्इंदुबाई राजेन्द्र गायकवाड, रेशमाबाई शांताराम गायकवाड, दुसऱ्या गटातील संशयित प्रकाश नथु गायकवाड, किरण वसंत पवार, नथु विठोबा गायकवाड, हिराबाई प्रकाश गायकवाड, अलका प्रकाश गायकवाड, योगीता उत्तम तुंगार, भैया प्रकाश गायकवाड, मंगल चिंतामण कुवर, लहु गांगुर्डे अशा २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.