२८ दुकानांचे फलक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:20 IST2018-03-11T00:20:36+5:302018-03-11T00:20:36+5:30
नाशिकरोड : परिसरातील पदपथावर व दुकानाच्या बाहेर अनधिकृतरीत्या लावलेले २८ दुकानांचे फलक मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले.

२८ दुकानांचे फलक जप्त
नाशिकरोड : परिसरातील पदपथावर व दुकानाच्या बाहेर अनधिकृतरीत्या लावलेले २८ दुकानांचे फलक मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. बिटको ते दत्तमंदिर सिग्नल, महात्मा गांधीरोड आदी ठिकाणी पदपथ व दुकानाच्या पुढे अनधिकृतरीत्या लावलेले फलक, विक्रीचे सामान आदी साहित्य मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी राबविलेल्या मोहिमेमध्ये जप्त केले. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. अडचणीचे ठरणारे फलक हटल्याने पदपथ मोकळे झाले आहे.