शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

परिचारिकांना २७ लाखांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:14 AM

नाशिक महापालिकेअंतर्गत शहरी आरोग्य सेवा केंद्रात २००७ साली कार्यरत असलेल्या २७ परिचारिकांना सेवेत कायम करण्याचे आमिष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दोघा मैत्रिणींच्या पतीने दाखवून सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

इंदिरानगर : नाशिक महापालिकेअंतर्गत शहरी आरोग्य सेवा केंद्रात २००७ साली कार्यरत असलेल्या २७ परिचारिकांना सेवेत कायम करण्याचे आमिष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दोघा मैत्रिणींच्या पतीने दाखवून सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित चौघा भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मीना दीपक कदम (४७, रा.वासननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यासह २७ परिचारिकांना सेवेत कायम करण्याचे आमिष संशयित छाया दीपक सपकाळ, दीपक सखाराम सपकाळ, माधुरी अनिल ठाकरे, अनिल ठाकरे या दाम्पत्यांनी दाखविले. मंत्रालयातून सुमारे दीड लाख रुपये खर्च करून सेवेत कायम करण्याची आॅर्डर आणावी लागेल असे सांगून २०१४-१५ साली २७ परिचारिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये प्रमाणे २७ लाख रुपये उकळल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अनेक महिने उलटूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने तत्कालीन नगरसेवक यशवंत निकुळे यांच्याकडे या परिचारिकांनी गाºहाणे मांडले होते. त्यांच्या मध्यस्तीने संशयितांनी ५० हजार रुपये परत केले. त्यानंतर सपकाळ व ठाकरे दाम्पत्यांनी कुठलीही दाद या परिचारिकांना दिली नाही. उर्वरित सुमारे २७ लाख रुपयांचा अपहार करत फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश दांडगे करीत आहेत.नांगरे-पाटील यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखलदीड ते दोन महिन्यांपूर्वी परिचारिकांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती; मात्र पोलिसांनी रक्कम अदा कशी केली व ती कोठून जमविली याबाबतचे ठोस पुरावे सादर करा, असे सांगून गुन्हा नोंदविला नव्हता. त्यानंतर पंधरा ते वीस परिचारिकांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर सगळा प्रकार कथन केल्यानंतर त्यांनी याप्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तत्काळ इंदिरानगर पोलिसांची कानउघडणी करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.यांची झाली फसवणूकमीना कदम, सारिका काळे, अरविंद वेताळ, नंदा कोल्हे, लता बाºहे, अनिता जोगी, आरती साळवे, मंजुळा भोये, भागाबाई पवार, सुनीता भोये, पल्लवी शिंदे, उर्मिला तुंगार, कविता बोडके, सोनाली निकम, रूपाली सदावर्ते, सुरेखा कडाळे, आशा देवरे, चंद्रकला बागुल, उषा निकम, पल्लवी उपळेकर, कविता ठाकरे, चंद्रकला गावित, छाया वानखेडे, स्मिता वझरे, नकुल डापके, रुपाली बारी.

टॅग्स :fraudधोकेबाजीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका