२६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:24 IST2020-07-25T20:49:52+5:302020-07-26T00:24:37+5:30

वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

26 lakh robbery case: Police arrest gang | २६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद

२६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद

वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. टोळीपैकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित संशयितांना लवकरच
अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक-पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात अज्ञात संशयितांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रकपुढे कार आडवी लावून चालक व क्लीनर यांना मारहाण करून ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोल व भ्रमणध्वनी, रोख रक्कम असा २६ लाख ६,२०० रु पयांच्या ऐवजाची जबरी लूट केली होती.
याबाबत दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाचे बारकावे, गुन्हा करण्याची पद्धत याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्याकडे समांतर सोपवला. गुन्ह्याबाबत पोलिसांना मालेगावचे धागेदोरे मिळाले. मालेगाव येथील अझहरखान वाजीदखान (३०, रा. प्लॉट नं ९, सर्व्हे नं. ७९, उमराबाग, देवीचा मळा) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवला असता मैहेफुस बाबू, जफर, सलमान व नन्हे या साथीदारांच्या मदतीने जबरी लूट केल्याची त्याने कबुली दिली.
---------------
पोलिसी खाक्या दाखवितास संशयिताकडून कबुली
ट्रक मालेगाव येथे नेऊन मलिक अहमद रा. धुळे याला ट्रकमधील माल विकल्याची माहिती दिली. ईटीआस कंपनीची कार (क्र. एमएच ०३ बीई ०३८२) भाड्याने घेऊन घोटी, मुंबई, गुजरात राज्यातील वापी असा प्रवास करत वापी येथून ट्रकचा (क्र . केए ५६ १९४५) पाठलाग केला व पेठरोडवर ट्रक अडवून लूट केली, अशी माहिती दिली. तसेच १२ ते १३ दिवसांपूर्वी मुंबई -आग्रारोडवर कसारा गावाजवळ ट्रक अडवून लूट केली होती. त्यातील काही माल चोरून त्याची विक्र ी केली व ट्रक संगमनेर येथे सोडून दिल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली.
-0-----------------------------
ट्रकसह कार जप्त
रासेगाव येथे लुटलेला ट्रक व गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कसारा भागात केलेल्या जबरी लुटीबाबत ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांच्या तपासपूर्तीनंतर सदर संशयितांना ठाणे पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
--------------
सराईतांची माहिती गोळा
वणी पोलीस ठाण्याअंतर्गत तिसगाव पेट्रोलपंपावर कळवण पोलीस ठाण्याअंतर्गत नांदुरी पेट्रोलपंपावर, तर दिंडोरी पोलीस ठाण्याअंतर्गत आशेवाडी शिवार अशा तीनही ठिकाणी जबरी लुटीच्या घटना आठवडाभरात झाल्याने डॉ. आरती सिंह व शर्मिष्ठा वालावलकर यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. अशा प्रकारचे गुन्हे करणाºया सराईत टोळ्यांची माहिती संकलित केली.

Web Title: 26 lakh robbery case: Police arrest gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक