हिरावाडीत २५ हजारांची घरफोडी
By Admin | Updated: May 22, 2014 00:23 IST2014-05-21T22:55:07+5:302014-05-22T00:23:41+5:30

हिरावाडीत २५ हजारांची घरफोडी
पंचवटी : हिरावाडी (शक्तीनगर) येथिल बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड असा पंचवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत लक्ष्मण बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारस फरसाण मागे असलेल्या एका बंगल्यात बोरसे कुटूंबिय राहत असून गेल्या रविवारी ते नातेवाईकाच्या विवाह सोहळयासाठी हरसुल (शिरसगाव) येथे कुटूंबियासमवेत गेले होते त्याच दरम्यान चोरटयांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश करून बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याचांदीचे दागिने तसेच दहा हजार रुपयांची रोकड असा पंचवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसर्या दिवशी बोरसे कुटूबियांना सकाळी शेजारी राहणार्या नागरीकांनी बोरसे यांना फोनवर माहीती दिल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघड झाले. दरम्यान चोरटयांनी बोरसे यांच्या घरात घरफोडी करण्यासाठी शेजारी राहणार्या काही नागरीकांच्या घरांच्या कडया बाहेरून लावून घेतल्या होत्या. हिरावाडीतील मध्यवस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुवारे तपास करीत आहेत. (वार्ताहर)