नाशिकमधील अडीचशे मुस्लीम बांधव अडकले कोलकोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:03 PM2020-03-25T12:03:00+5:302020-03-25T12:05:07+5:30

नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन होण्या आधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे.

250 Muslim brothers in Nashik trapped in Kolkata | नाशिकमधील अडीचशे मुस्लीम बांधव अडकले कोलकोत्यात

नाशिकमधील अडीचशे मुस्लीम बांधव अडकले कोलकोत्यात

Next
ठळक मुद्देरेल्वे, विमान सेवा बंद असल्यानेपरतण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आवाहन

नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन होण्या आधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे.

कोरोनामुळे सध्या देशभरात दळवळणाची साधने बंद झाली आहेत. मात्र त्यापूर्वी नाशिकमधील अडीचशे मुस्लीम समाज बांधव येथे मालदा टाऊन पासून १८ किलो मीटर अंतरावरील एका गावात अडकले आहेत. दरवर्षी येथील पंडवाश्री दर्ग्यास भेट देण्यासाठी हे नागरीक जात असतात. यंदा १३ मार्च रोजी ते गेल्यानंतर २३ मार्च रोजी मालदा टाऊन ते नाशिकरोड अशी त्यांची रेल्वे होती. मात्र त्यांना त्यापूर्वी २० तारखेला रेल्वेने तिकीट आरक्षण रद्द करून रेल्वही जाणार नसल्याचे कळवले. त्यातच विमास सेवा देखील बंद झाल्याने त्यांची अडचण झाली आहे.

नाशिक शहरातील जुने नाशिक आणि नाशिकरोड भागातील नागरीक आहेत. त्यांनी मदतीसाठी याचना केली आहे.

Web Title: 250 Muslim brothers in Nashik trapped in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.