आश्रमशाळेतील २५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:50 IST2021-03-24T22:13:30+5:302021-03-25T00:50:43+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला असून विविध संस्थांमध्ये तपासण्या सुरू केले असता एकलव्य आश्रमशाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आश्रमशाळेत तब्बल २५ मुले पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आलेआहे.

आश्रमशाळेतील २५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला असून विविध संस्थांमध्ये तपासण्या सुरू केले असता एकलव्य आश्रमशाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आश्रमशाळेत तब्बल २५ मुले पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आलेआहे.
इगतपुरी तालुक्यातील एकलव्य आश्रमशाळेतील कार्यरत असलेले शिक्षक पॉझिटिव्ह आले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेले २५ विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत. एकलव्य आश्रमशाळेतील २६५ विद्यार्थी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ विद्यार्थिनी व ६ विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तात्काळ आश्रमशाळेतच आयसोलेट करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.