पाच दिवसांत टिपले २५ पुष्प

By Admin | Updated: November 9, 2014 01:48 IST2014-11-09T01:48:15+5:302014-11-09T01:48:53+5:30

पाच दिवसांत टिपले २५ पुष्प

25 floss tip in five days | पाच दिवसांत टिपले २५ पुष्प

पाच दिवसांत टिपले २५ पुष्प

नाशिक : आधुनिकतेच्या काळात मोबाइलमधून प्रत्येक जण काही तरी वेगळे ‘कॅप्चर’ करण्याचा प्रयत्न करत असतो. असाच प्रयत्न सातपूर परिसरातील कदंबवन कॉलनीत मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबामधील रविना या आदिवासी मुलीने मोबाइलच्या कॅमेराचा वापर करत विविध सुंदर पुष्प टिपले आहेत. त्यापैकी निवडक २५ पुष्पांच्या छायाचित्रांचे ‘...फुले वेचिता’ प्रदर्शन न्याहाळताना नाशिककर भारावून गेले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये फुले वेचिता या प्रदर्शनाचे उद्घाटन वनाधिपती विनायकदादा पाटील, छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. छायाचित्रण हा दिवसेंदीवस सर्वांच्याच अत्यंत आवडीचा विषय बनत चालला असून, छायाचित्रणाला सोशल नेटवर्किंगची जोड लाभल्यामुळे सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच छायाचित्रणाचा मोह आवरता येणे अवघड झाले आहे. मोबाइलमध्ये एक मेगापिक्सेलपासून, तर दहा मेगापिक्सेलपर्यंत कॅमेरा उपलब्ध विविध कंपन्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे छायाचित्रण अगदी ‘हातात’ आले आहे. रविना मौले या शाळकरी मुलीनेदेखील आपल्यामधील सुप्त गुण ओळखत पानाफुलांची व निसर्गाच्या आवडीमुळे क दंबवन कॉलनीमध्ये सकाळी तासभर फिरून फुलांची मनमोहक छायाचित्रे टिपली. पाच दिवसांमध्ये तिने टिपलेल्या विविध पुष्पांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकामध्ये भरविण्यात आले आहे. कमळ, गुलाब, जास्वंद, सोनचाफा, सदाफुली अशा पुष्पांचे तिने अत्यंत मनमोहक असे छायाचित्र मोबाइल कॅमेऱ्याने टिपले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 25 floss tip in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.