२५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: August 7, 2016 00:58 IST2016-08-07T00:58:12+5:302016-08-07T00:58:37+5:30

२५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

25 Attendees took 40 application for candidature | २५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

२५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

नाशिकरोड : जेलरोडप्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत एकूण २५ इच्छुकांनी ४० उमेदवारी अर्ज नेले आहेत.
जेलरोड प्रभाग ३५ ब च्या नगरसेविका शोभना शिंदे व ३६ ब चे नगरसेवक नीलेश शेलार यांना पक्षाचा व्हीप झुगारल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक येत्या २८ आॅगस्ट रोजी होत आहे. उमेदवारी अर्जविक्री व भरून देण्याच्या आज पाचव्या दिवशी दोन्ही प्रभागातून एकूण २५ इच्छुकांनी ४० उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये प्रभाग ३५ ब - शरद मोरे, मंदाबाई ढिकले, छाया आढाव, वंदना चाळीसगावकर, वृषाली नाठे, सोनाली काजळे, मंदा फड, शांताबाई शेजवळ या आठ जणांनी व प्रभाग ३६ ब - शरद मोरे, पंकज गाडगीळ, उमेश शिंदे, योगेश मोगल, प्रवीण पवार, मिलिंद रसाळ, बाळासाहेब शेलार, अशोक गायकवाड, नितीन चंद्रमोरे, सुरेखा निकम, रवींद्र अहिरे, मंगेश मोरे, लक्ष्मण मोरे, शशिकांत उन्हवणे, मनीषा शेजवळ, योगेश शेजवळ, वृषाली मोरे या १७ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
उमेदवारी अर्ज भरून देण्याची अंतिम मुदत येत्या मंगळवारपर्यंत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 25 Attendees took 40 application for candidature